छायाचित्र दालन
सहकार सप्ताह २०२६
जेव्हा सहकारी संस्थांचे संचालक मालकासारखे वागू लागतात, तेव्हा त्या संस्था अडचणीत येतात. ‘सहकारातून समृद्धी’, ‘सहकारातून विकास’ आणि ‘सहकारातून आत्मनिर्भर भारत’ या संकल्पनांनुसार आपला दृष्टिकोन बदलणे आवश्यक आहे.- श्री संतोष बिडवई विभागीय सहनिबंधक छत्रपती संभाजीनगर,
पैठण येथे ‘शालिवाहन क्रेडिट सोसायटी’, ‘सहकारी संस्थांचे सहाय्यक निबंधक कार्यालय’ आणि ‘सहकार भारती’ यांच्या संयुक्त विद्यमाने सहकार सप्ताहनतर्गत सहकारी क्षेत्रावर आधारित एका परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी छत्रपती संभाजीनगरचे विभागीय सह-निबंधक श्री. संतोष बिडवई होते. तसेच, श्री. समृत जाधव (जिल्हा उप-निबंधक, छत्रपती संभाजीनगर) यांची प्रमुख उपस्थिती होती , श्री. बलराम नवथर (सहाय्यक निबंधक, पैठण), सुनील मोटलग (राज्य सचिव, सहकार भारती), आबासाहेब देशमुख (उपाध्यक्ष, महाराष्ट्र लेखापरीक्षक संघटना), डॉ. पंडित किल्लारीकर आणि रुपेश चौहान (संचालक, शालिवाहन क्रेडिट सोसायटी) हे मान्यवर उपस्थित होते. शालिवाहन क्रेडिट सोसायटीचे अध्यक्ष श्री. किशोर चौहान यांच्यासह पैठण तालुक्यातील विविध सहकारी संस्थांचे अनेक पदाधिकारी आणि कर्मचारी या परिसंवादाला उपस्थित होते.
माननीय राज्यपाल यांच्या हस्ते ‘एक पेड मां के नाम ‘ अंतर्गत राजभवन येथे वृक्षारोपण
महाराष्ट्राचे सहकार मंत्री माननीय बाबासाहेब पाटील, माननीय पंकज भोयर राज्यमंत्री (सहकार), माननीय मंगल प्रभात लोढा कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नवोन्मेष मंत्री यांचे उपस्थितीत महाराष्ट्राचे माननीय राज्यपाल यांच्या हस्ते ‘एक पेड मां के नाम ‘ अंतर्गत वृक्षारोपण