बंद

    रासायनिक खतांचा संरक्षित साठा

    • तारीख : 02/02/2025 -
    • क्षेत्र: कृषी

    राज्यातील मागणीच्या तुलनेत खताच्या पुरवठयातील तुट भरुन काढण्यासाठी केंद्र शासनाच्या निर्देशानुसार केंद्र शासनाने नियुक्त केलेल्या खत कंपन्याकडून डीएपी/युरीया व संयुक्त खताची आयात करुन खताचा संरक्षित साठा करुन राज्यातील शेतकऱ्यांना वेळेवर खताचा पुरवठा होण्यासाठी सन २००१ पासून रासायनिक खतांचा संरक्षित साठा योजना ही योजना राज्यात महाराष्ट्र राज्य पणन महासंघाकडून राबविण्यात येते.

    सदर योजेनेसाठी हंगाम सुरु होण्यापूर्वी महाराष्ट्रातील सर्व जिल्हयात खतांचा संरक्षितसाठा करण्यात येत असून, त्याची विक्री संबंधित जिल्हयाचे कृषी विकास अधिकारी यांच्या अधिपत्याखाली होते. खत खरेदीसाठी शासनाकडून शासन हमी देण्यात येते. तसेच साठवणूक करण्यासाठी येणाऱ्या अनुषंगिक खर्चाची प्रतिपूर्ती (प्राथमिक वाहतूक, दुय्यम वाहतूक, गोदाम भाडे, हमाली विमा, कर्जा वरील व्याज इ.) शासनाकडून होते.

    शेतकऱ्यांना वेळेवर व उच्चतम किरकोळ विक्री दरापेक्षा कमी किंमतीमध्ये खत प्राप्त होण्यासाठी सन २०११ पासून राज्यामध्ये बांधावर खत योजना यशस्वीरित्या राबविण्यात येत आहे.

    लाभार्थी:

    शेतकरी

    फायदे:

    समयोजित खत पुरवठा, सरकारी हमी, अतिरिक्त खर्चांसाठी निधी

    अर्ज कसा करावा

    महाराष्ट्र राज्य सहकारी विपणन महासंघ लिमिटेड, जिल्हा कृषी विकास अधिकारी यांच्यामार्फत