डॉ.पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना
शासन निर्णय क्रमांक सीसीआर 1491/प्र.क्र.714/2-स, दि.02.11.1991 अन्वये दि.01.04.1990 पासून पीक उत्पादन प्रोत्साहन योजना या नावाने सदरची योजना अंमलात आली आहे. पीक कर्जाची वसुली मुदतीपूर्वी होण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहनात्मक अनुदान देणे हा या योजनेचा उद्देश आहे. शेतकऱ्यांनी घेतलेल्या अल्पमुदती पीककर्जाची संपुर्ण परतफेड प्रतीवर्षी दि. 30 जून पूर्वी केल्यास शेतकऱ्यांना शासनाकडून व्याज सवलत अनुदान स्वरुपात देण्यात येत आहे. दि. 11/06/2021 रोजीच्या शासन निर्णयान्वये रु. तीन लाखापर्यतच्या पीक कर्जासाठी 3 टक्के दराने व्याज सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला.
शासनाने दिनांक 18.06.2007 रोजी कायदा कलम 79 (अ) अन्वये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका व विकास संस्थांना निर्देश देऊन शेतकरी जर पीककर्जाची संपुर्ण परतफेड प्रतीवर्षी 30 जून पूर्वी करीत असेल तर अशा शेतकऱ्यांकडून फक्त कर्ज मुद्दल वसुल करण्याबाबत व या कर्जावरील व्याजाची रक्कम शासनाकडे मागणी करण्याबाबत सुचना दिल्या आहेत. पीक कर्जाची परतफेड शेतक-यांनी विहित मुदतीत केल्यास त्यांना केंद्र शासनाच्या त्याचप्रमाणे प्रस्तुत योजनेचा लाभ मिळून रु. तीन लाखापर्यतचे पीक कर्ज बिन व्याजी उपलब्ध होत आहे.
सन 2024-25 मध्ये सदर योजनेसाठी 9.38 लाख लाभार्थी शेतकऱ्यांना रु. 300 कोटी चा लाभ वितरीत झालेला आहे.
लाभार्थी:
शेतकरी
फायदे:
वर नमूद केल्याप्रमाणे