कापूस खरेदी योजना
केंद्र शासनाच्या निर्देशानुसार व आधारभूत किंमतीनुसार महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघामार्फत राज्यात कापूस प्रापण योजना राबविण्यात येत आहे. सदर योजनांतर्गत कापूस खरेदी करणे, कास्तकरांची कापसाची किंमत विहित वेळेत त्यांना देणे आणि गाठी तयार करणे, त्यांची विक्री करणे व या कामासाठी आवश्यक असणाऱ्या जिनिंग प्रेसिंग फॅक्टरी, प्रयोगशाळा, गोदामे इ. यंत्रणा कार्यान्वीत असून, सदर यंत्रणेचे कार्यान्वयन हे महासंघाकडून करण्यात येते.
लाभार्थी:
कापूस शेतकरी
फायदे:
कच्च्या कापसाची खरेदी, वर्गीकरण, जिनिंग, शेतकऱ्यांना देय, एकाधिकार अधिनियमाचे कठोर पालन, गाठीतील कापूस आणि बियाण्यांची विक्री, कापूस विमा, जिनिंग आणि प्रेसिंग कारखान्यांच्या करारांचे प्रावलीकरण आणि नूतनीकरण
अर्ज कसा करावा
महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक विपणन महासंघ (एमएससीजीएमएफ) आणि संबंधित एजन्सीद्वारे