संकल्प आणि ध्येय
संकल्प
आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र सहकारी संस्थांच्या विकासाद्वारे महाराष्ट्रातील सहकारी चळवळीला बळकटी देणे.
ध्येय
राज्यातील सर्व सहकारी संस्था — ग्रामीण तसेच नागरी — यांचे कार्य प्रभावीपणे, तत्परतेने व उत्तरदायित्वाने पार पडावे, यासाठी प्रशासन सक्रिय भूमिका घेत असते. या संस्थांमधील सदस्यांच्या सामूहिक विकासाची उद्दिष्टे साध्य होण्यासाठी शासन सातत्याने प्रयत्नशील आहे.
संस्था सदस्यांचा सक्रीय सहभाग आणि व्यावसायिक व्यवस्थापन यांच्या माध्यमातून सेवा पुरवठ्याची गुणवत्ता सुधारण्यावर विशेष भर देणे व सहकारी संस्थांच्या कारभारात शिस्त आणि आर्थिक शुद्धता राखणे यासाठी शासन सातत्याने प्रयत्नशील आहे.
सहकार क्षेत्र हे महाराष्ट्राच्या सामाजिक आणि आर्थिक प्रगतीचे एक मूलभूत अंग आहे. त्यामुळे या क्षेत्राचे कार्य परिणामकारक, पारदर्शक आणि जनसामान्यांच्या हिताचे होण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचा प्रशासनाचा संकल्प आहे.