सहकार, पणन आणि वस्त्रोद्योग विभाग, महाराष्ट्र, आपले स्वागत करीत आहे.
कृषी-औद्योगिक अर्थकारण आणि विशेषत: ग्रामीण पत क्षेत्रात सहकार, पणन आणि वस्त्रोद्योग विभाग महत्त्वाची भूमिका बजावतो. या विभागाचे काम ग्रामीण वित्त, कृषी पणन, औद्योगिक सहकार, बाजार नियामक आणि पैसे कर्जाऊ देण्यासारख्या बाबींशी संबंधित आहे.
राज्यातील सहकार क्षेत्र, कृषी उत्पादन पणन क्षेत्र आणि वस्त्रोद्योग क्षेत्राच्या प्रशासन आणि संनियंत्रणासाठी हा विभाग जबाबदार आहे. या क्षेत्राला सक्षम करणारे आमचे सर्व भागीदार, विशेषत: सहकार क्षेत्रातील सदस्यांच्या जीवनशैलीत सुधारणा करणे, यावर आम्ही लक्ष्य केंद्रित केले आहे.
मदतकक्ष क्रमांक : 022-40293000