आमचे प्रमुख प्रकल्प

पणन विभाग प्रमुख प्रकल्प

IFAD सहाय्यित समन्वयित कृषि विकास प्रकल्प

इंटरनॅशनल फंड फॉर ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट (IFAD) या संस्थेच्या सहकार्याने विदर्भातील शेतक-यांच्या आत्महत्यांनी ग्रस्त सहा जिल्हयांमध्ये रु. 59323 लाख गुंतवणूकीचा शाश्वत कृषि विकासावर आधारीत 'समन्वयीत कृषि विकास प्रकल्प' दि.4.12.2009 पासून राबविण्यात येत आहे.  सदर प्रकल्पासाठी सन 2013-14 या आर्थिक वर्षासाठी उपलब्ध करुन देण्यात आलेल्या रु.2502.10 लाख अर्थसंकल्पीय तरतुदीतून विकास कामे करण्यात आलेली आहेतसन 2014-15 करीता या प्रकल्पास रु.2361.00 लाख तरतूद प्रस्तावित करण्यात आली आहे.

 

महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषि विकास प्रकल्प

राज्यातील पणन व्यवस्थेतील पायाभूत सुविधांचे बळकटीकरण व आधुनिकीकरणाकरीता राज्यातील 33 जिल्हयांमध्ये जागतिक बँक सहाय्यीत 'महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषि विकास प्रकल्प' दि.20.12.2010 पासून राबविण्यात येत आहे. या प्रकल्पांतर्गत राज्यातील 100 कृषि उत्पन्न बाजार समित्यांचे, 300 ग्रामीण आठवडी बाजार व 24 जनावरांचे बाजार येथे आवश्यक पायाभूत व मुलभूत सुविधा विकसीत करण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे गोदाम पावती सुविधा, कृषि मालाचे ई-ट्रेडींग व सामुदायिक सेवा केंद्रांव्दारे शेतक-यांचे संघटन करण्यात येणार आहे. सदर प्रकल्पासाठी सन 2013-14 करीता रु.6370.00 लाख अर्थसंकल्पीय तरतूदीतून विविध विकास कामे करण्यात आली आहेत. सन 2014-15 करीता या प्रकल्पास रु.5467.00 लाख तरतूद प्रस्तावित करण्यात आली आहे. 

 

आशियायी विकास बँक  सहाय्यित 'कृषि व्यापार विषयक पायाभूत सुविधा विकास गुंतवणूक कार्यक्रम'

आशियायी विकास बँकेच्या सहाय्याने 'कृषि व्यापार विषयक पायाभूत सुविधा विकास गुंतवणूक कार्यक्रमाची अंमलबजावणी सन 2011-12 पासून करण्यात येत आहे. या प्रकल्पांतर्गत राज्यातील 33 जिल्हयांमधील प्रमुख पिकांकरिता सार्वजनिक खाजगी भागिदारीतुन एकात्मिक मुल्य साखळयांची (Integrated Value Chains) उभारणी करण्यात येणार आहे. सदर प्रकल्पासाठी सन 2013-14 या आर्थिक वर्षासाठी उपलब्ध करुन देण्यात आलेल्या रु.400.00 लाख अर्थसंकल्पीय तरतूदीतून विविध विकास कामे करण्यात आली आहेतसन 2014-15 करीता या प्रकल्पास रु.400.00 लाख तरतूद प्रस्तावित करण्यात आली आहे